बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (15:33 IST)

आगामी 25 वर्षात बिल गेट्‌स जगातील पहिले “ट्रिलीयन’ बनण्याची शक्‍यता

आगामी 25 वर्षात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स हे  जगातील पहिले “ट्रिलीयन’ बनण्याची शक्‍यता आहे. एका संशोधनाच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑक्‍सफॅम इंटरनॅशनल या संशोधन संस्थेने याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले आहे. जगातील पहिले अब्जाधीश असलेले बिल गेट्‌स आणखी 25 वर्षांनी जेंव्हा 86 वर्षांचे होतील, तेंव्हा 100 अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे मालक झालेले असतील, असा अंदाज या संशोधनामध्ये व्यक्‍त करण्यात आला आहे. बिल गेट्‌स यांची मालमत्ता 2009 पासून दरवर्षी 11 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. त्याच्या आधारे “ऑक्‍सफॅम इंटरनॅशनल’ने दिलेल्या या अवालामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिल गेट्‌स यांनी 2006 साली मायक्रोसॉफ्टची मालकी सोडली. त्यावेळी त्यांच्याजवळ 50 अब्ज डॉलरची मालमत्ता होती. तर 2016 सालापर्यंत ही मालमत्ता 75 अब्ज डॉलर पर्यंत वाढलेली होती.   फोर्ब्सच्या अंदाजानुसार गेट्‌स यांच्याकडे सध्या 84 अब्ज डॉलरची मालमत्ता आहे.