Widgets Magazine

चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेवर बंदी

भारत-चीन सीमेवर सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची हाणामारी झाली होती. याबाबतचा व्हिडीओ समोर आला होता. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताच्या हद्दीतील सिक्कीम सेक्टरमध्ये घुसून दोन बंकर उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये कमालीचा तणाव आहे.
या तणावातून चीनने सिक्कीमच्या नाथूला दर्रेपासून होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेवरही बंदी आणली आहे. भारतातून कैलास मानसरोवरकडे जाणाऱ्या भाविकांचा मार्गही चीनने रोखला. दरम्यान, चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याने भारतीय सैनिकांची डोकेदुखी वाढली आहे.


यावर अधिक वाचा :