Widgets Magazine

200 रुपयांच्या अंगठीला लागली कोटींची बोली

लंडन| Last Modified सोमवार, 12 जून 2017 (11:28 IST)
लंडनमध्ये राहणार्‍या एका महिलेने जसेच एका सेलमध्ये 37 वर्षांपूर्वी एक अंगठी खरेदी केली होती. त्यावेळी ही अंगठी महिलेने केवळ 200 रुपयांमध्ये खरेदी केली होती. तब्बल 37 वर्षें ही अंगठी वापरल्यानंतर एक दिवस अचानक आपण घालत असलेली अंगठी साधी नसून खर्या हीर्‍याची असल्याचे तिला कळाले. मात्र इतक्या कमी किंमतीला घेतलेली अंगठी हिर्‍याची असेल यावर तिचा विश्वासच बसेना. मग खात्री करण्यासाठी ती सोनाराकडे गेली आणि अंगठीत खरंच 26 कॅरेच्या हीरा असल्याचे समजल्याने ती चकीत झाली. इतकी किंमती अंगठी विकल्यास किती पैसे येतील याचा अंदाजही या महिलेला नव्हता. त्यामुळे तिने दागिन्यांचा लिलाव करणार्‍या एका संस्थेशी संपर्क केला. संस्थेमध्ये ही अंगठी विकण्यासाठी लिलाव जाहीर झाला आणि अंगठी विकण्यासाठी लिलाव जाहीर जाला आणि
अंगठी खरेदी करण्यासाठी बोली लावण्यात आली. त्या अंगठीची किंमत धोडीथोडकी नाही तर तब्बल 5 कोटी 46 लाखपर्यंत पोहोचली.


यावर अधिक वाचा :