गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 8 जुलै 2017 (09:21 IST)

दिल्ली-वॉशिंग्टन थेट विमान सेवा सुरू

दिल्लीहून अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे एअर इंडियाची थेट विमान सेवा सुरू झाली असून दिल्लीहून निघालेले पहिले विमान आज वॉशिंग्टनच्या डल्लस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. या थेट विनाथांबा विमान सेवेद्वारे जगातल्या दोन मोठ्या लोकशाहीवादी देशांच्या राजधान्य जोडल्या गेल्या आहेत. एअर इंडियाचे हे थेट विमान वॉशिंग्टनला पोहचल्यावर या विमानाला वॉटर कॅनन समारंभाने मानवंदना देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. या पहिल्या विमानात भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना, एअर इंडियाचे चेअरमन अश्‍विनी लोहानी, आणि कमर्शियल संचालक पंकज श्रीवास्तव हे प्रवासी म्हणून सहभागी झाले होते. या सेवेसाठी एअर इंडियाने बोईंग 777-200 एलआर जातीचे विमान तैनात केले आहे.
 
हे 238 प्रवासी क्षमतेचे विमान आहे. यानंतर 9 ते 17 जुलै या अवधीत या मार्गावर 321 प्रवासी क्षमतेचे विमानही सोडण्यात येणार आहे. भारतातून वॉशिंग्टनला दरवर्षी साधारण तीन लाख प्रवासी जात असतात. त्यांच्यासाठी ही मोठी सुविधा यानिमीत्ताने उपलब्ध झाली आहे.2025 पर्यंत ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्‍यता आहे.