मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (14:23 IST)

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

न्यूयॉर्क- रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव करुन विजय नोंदवली आहे. ते राष्ट्रध्यक्ष बनणारे अमेरिकेतील सर्वात वृद्ध राजनयिक असतील.
 
ओहिओ, नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडा या राजकीय दृष्टया अत्यंत संवेदनशील राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षास मिळालेल्या नेत्रदीपक विजयांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे नेतृत्व ट्रम्प यांच्याकडेच येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. ट्रम्प यांचा हा विजय हिलरी समर्थकांसाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे.
 
ट्रम्प हे आता अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील "इलेक्‍टोरल कॉलेज‘व्यवस्थेनुसार 27 राज्यांमधील 276 मते जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांच्या तुलनेमध्ये हिलरी यांना केवळ 218 मतेच मिळविण्यात आल्याने डेमोक्रॅट समर्थकांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.
 
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकांचा आभार व्यक्त करत म्हटले की मी सर्वांचा राष्ट्रध्यक्ष आहे. आमची सरकार लोकांची सेवा करेल. आम्ही देशाचा पुननिर्माण करणार. त्यांनी लाखो लोकांना काम देण्याचा आणि देशाला विकासच्या मार्गावर घेऊन जाण्याचा आश्वासन दिला. त्यांनी म्हटले की इतर देशांसोबत चांगले संबंध स्थापित करून ते अमेरिकेला अधिक मजबूत करतील.