गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ऑस्ट्रेलियात 5 वर्षांमध्ये भारतीयांची संख्या झाली दुप्पट

सिडनी - भारत आपले उमदे कौशल्य आणि स्वस्त मनुष्यबळामुळे जागतिक शक्ती बनण्याच्या दिशेने अग्रेसर असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारखे देश भारतीय प्रतिभांमुळे सर्वोच्च स्तरावर कायम राहण्याचे स्वप्न पाहतात. या देशांमधील भारतीयांच्या प्रतिभेला मागणी वाढत आहे. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटटिक्सचा (एबीएस) नवा अहवाल देखील या गोष्टीची पुष्टी देतो. ऑस्ट्रेलियात मागील ५ वर्षांमध्ये भारतीयांची संख्या दुप्पट झाली आहे. तेथे हिंदू धर्म सर्वाधिक वेगाने वाढणारा धर्म ठरला आहे.
जवळपास ४० हजार भारतीय कार्यक्रमांमुळे २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियात गेले. तर २०१४-१५ दरम्यान अशांची संख्या केवळ ३४८७४ एवढीच होती. २०११च्या जनगणनेत हिंदू धर्म ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेगाने फैलावणारा धर्म आढळला होता. २०१६च्या जगणनेत २.७ टक्के हिंदू लोकसंख्येचा अनुमान आहे. तर तेथे इस्लाम मानणा-यांची संख्या २.६ टक्के आहे. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटटिक्सनुसार ऑस्ट्रेलियात येणाऱया भारतीयांमध्ये ५४.६ टक्के भारतीय पदवीधर किंवा उच्चशिक्षण प्राप्त केलेले आहेत. हा आकडा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सरासरीच्या तीनपट अधिक आहे.
 
ऑस्ट्रेलियाचे दक्षिणपूर्व राज्य व्हिक्टोरिया भारतीयांचे पसंतीचे ठिकाण आहे. तेथील स्थलांतरितांच्या संख्येत २.१ टक्के वाढ झाली आहे. एबीएसनुसार भारतीयांची वाढती संख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देईल.