शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जपानला 18 वर्षांनी मिळाला सुमो चॅम्पियन

जपान हा देश सुमो कुस्तीसाठी ओळखला जातो. सुमो चॅम्पियन मिळण्यासाठी 18 वर्षांची वाट पाहावी लागली. मागील आठवड्यात किसेनोसातो या नावाने प्रसिद्ध असलेल्या मल्लाने सर्व सुमो कुस्तीगिरांना चीतपट करून आपल्या देशाला सुमो मिळवून दिला आहे.किसेनोसातो हा 30 वर्षांचा असून त्याचे खरे नाव युताका हागिवारा असे आहे. त्याचे वजन178 किलो असून तो 1.88 मीटर उंच आहे.
 
सुमो कुस्तीचा प्रारंभ जपानमध्ये 1000 वर्षांपूर्वी झाला. सुमोच्या विजेत्याला योकोझुना या नावाने ओळखले जाते. योकोझुना मल्ल हे सर्वोच्च पातळीवरील स्पर्धेत भाग घेतात, मात्र 1998 पासून कोणत्याही जपानी व्यक्तीने हा खिताब पटकावला नव्हता. गेल्या 20 वर्षांमध्ये झालेले सर्व सुमो विजेते हे मंगोलिया, हवाई आणि अमेरिकन सामोआ येथून आले होते. न्यू ईयर ग्रॅंड सुमो टूर्नामेंट या स्पर्धेत किसेनोसातोने आपले पहिले विजेतपट पटकावले. सामान्यतः सुमो मल्लाला दोन सलग स्पर्धा जिंकल्यानंतर योकोझुना म्हणून जाहीर केले जाते. परंतु किसेनोसातोचा ताजा विजय आणि अलीकडच्या स्पर्धांमधील मजबूत कामगिरीमुळे त्याला हा मान मिळाला आहे.