Widgets Magazine

युवकाचे गुप्तांग कापले, डोळेही फोडले

crime
लाहोर- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयात मुलीच्या नातेवाइकांनी एका 15 वर्षीय तरुणाला भयंकर यातना देत आधी त्याचे गुप्तांग कापले आणि इतक्यावर ही राग शांत झाला नाही तर त्याचे डोळे काढून घेतले. नवींच्या वर्गात शिकणार्‍या या तरुणाने डोळे तर नेहमीसाठी गमावले तसेच वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव मात्र वाचला.
मुलाच्या नातेवाइकांनी शहरात मुलीच्या नातेवाइकांविरुद्ध प्रदर्शन केल्याने प्रकरण उघडकीस आले. त्याच्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याप्रमाणे मुलीच्या वडील आणि त्याच्या साथीदारांनी मुलीसोबत असल्याच्या संशयावरून मुलाला फेब्रुवारीच्या शेवटल्या आठवड्यात किडनॅप केले होते.
मुलाला शाळेतून पळवून रावी नदीजवळीक निर्जन स्थळावर नेण्यात आले आणि तिथे त्याचे गुप्तांग कापून डोळेही फोडले. यानंतर आरोपी फरार झाले.

लाहोर वरिष्ठ पोलिस अधिकारी हैदर अशरफ यांनी सांगितले की पाची आरोपींना अटक केली गेली असून प्रकरणाची तपासणी सुरू आहे.


यावर अधिक वाचा :