testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्स करताना किंचाळली अन् तुरुंगात गेली

बर्मिगहॅम- ब्रिटनमध्ये एका तरुणीला दोन आठवडे तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सेक्स करताना किंचाळत असल्याने 23 वर्षीय तरूणी जेमा वेल हिला कोर्टाने ही शिक्षा सुनावली. जेमाल वेल ही तरूणी बेर्मिगहॅम सिटी काउंसिलमध्ये राहते. गेल्या 29 जूनला जेमा वेल या तरूणीने सेक्स करताना खूप आवाज केला. तिच्या फ्लॅटमधून येणार्‍या आवाजाने आजूबाजूचे शेजारी वैतागले आणि त्यांनी थेट पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी खटला सुरू झाला.
जेमा वेलवर असामाजिक वर्तवणुकीचे आरोप करण्यात आले होते. त्यात ती दोषी आढळून आली आणि जेमला दोन आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली. शेजार्‍यांना त्रास होईल असे कुठलेही गैरवर्तन करू नये असेही जेमला बजावण्यात आले आहे. या प्रकरणात जेमच्या बॉयफ्रेंडला कोणतीही शिक्षा करण्यात आलेली नाही. डेली मेलच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

जेमा सेक्स करताना जोर-जोरात आवाज करायची आणि हा आवाज किमान 10 मिनिटांपर्यंत सुरू रहायचा. आम्ही शेजारी राहत असल्यामुळे जेमाच्या आवाजाने आमची झोप उडत होती. तिच्या आवाजाने माझ्या मुलांवरही परिणाम व्हायचा. यामुळे आम्हाला टीव्हीचा आवाज वाढवावा लागायचा. तिच्या शेजारी राहणे म्हणजे नरकात राहण्यासारखे होते. तिचे थोबाड सुद्धा बघण्याची इच्छा नाहीये आमची. एवढेच नव्ह तर तिच्या पार्ट्या पाच वाजेपर्यंत सुरू असायच्या आणि दिवसभर ती झोपून असायची, असे जेमाच्या शेजारी रहात असलेल्या एका महिलेने सांगितले.


यावर अधिक वाचा :