testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत

Last Modified शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:56 IST)

संयुक्त राष्ट्र महासचिव ऍन्टोनियो गुटेरेसने नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून केली आहे. जगातील कोणत्याही नागरिकासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखाकडून दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.

अनेक अडचणी येऊनही मलालाने महिला, मुली आणि इतरांच्या शिक्षणासाठी, अधिकारासाठी काम सुरूच ठेवले आणि म्हणूनच तिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून करण्यात आल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे.
मलाल जगभरातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम करेल, अशी घोषणा संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी केली आहे. संयुक्‍त राष्ट्रामध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात मलालाला ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.यावर अधिक वाचा :