Widgets Magazine

'सॉना बाथ' घेत असलेल्या आई मुलीचे दार लॉक झाल्याने झाला मृत्यू

Last Modified मंगळवार, 18 एप्रिल 2017 (11:42 IST)
जरा विचार करा की तुम्ही आराम करण्यासाठी एखाद्या खोलीत बंद झाले आहात आणि तेच बंद दार तुमच्या जीवनातील
शेवटचे क्षण बनू शकतात. चेक रिपब्लिकच्या दोन महिलांसोबत असेच काही झाले. शनिवारी नॉर्थन चेक रिपब्लिकमध्ये आई आणि मुलगी सॉना बाथ घेत होत्या, बरेच वेळ दार बंद राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

दीड तासापर्यंत दोघी खोलीत होत्या
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, 65 वर्षीय आई आणि 45 वर्षीय मुलगी येथील गार्डन कॉलोनीत आपल्या मित्रांकडे गेल्या होत्या,
जेथे त्या सॉना बाथचा आनंद घेत होत्या. त्या दोघी तब्बल दीड तास खोलीत होत्या, बर्‍याच वेळेपर्यंत त्यांनी जेव्हा दार उघडले नाही तर त्यांचे मित्र खोलीत गेले. खोलीत त्या दोघी बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या मित्रांनी जेव्हा त्यांची नाडी बघितली तेव्हा दोघांचा मृत्यू झालेला होता.

दाराचे हँडल आतून तुटले होते
असे अंदाज लावण्यात येत आहे की खोलीच्या दाराचे हँडल आतून तुटले होते, ज्यामुळे दोघी बाहेर येऊ शकल्या नाही. आई मुलीने दार तोडण्याची प्रयत्न केला पण ते काही त्यांच्याकडून झाले नाही. पोलिस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत आहे.


यावर अधिक वाचा :