testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या

Last Modified शनिवार, 4 मार्च 2017 (17:05 IST)
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. 43 वर्षीय हरनिश पटेल यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
हरनिश पटेल दक्षिण कॅरोलिनाच्या लँकस्टर शहरात राहत होते. गुरुवारी रात्री ही घटना घडली. हरनिश पटेल रात्री 11 वाजता दुकान बंद करुन घराकडे निघाले होते. त्यानंतर 10 मिनिटातच त्यांच्या घरापासून काही अंतरावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री एका महिलेने पोलिसांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. महिलेने आपण ओरडण्याचा आणि गोळ्यांचा आवाज ऐकल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हरनिश मृतावस्थेत आढळले. पोलिस आरोपींचा तपास करत आहेत.


यावर अधिक वाचा :