Widgets Magazine

मी तर झालो सेल्फीचा बंदी: ओबामा

अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून मी सेल्फीचा बंदी झालो आहे, अशी मिश्किल टिप्पणी बराक ओबामा यांनी केली आहे. अध्यक्षपद सोडल्यानंतर ओबामा यांनी परदेशातील पहिले भाषण केले. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
इटालीतील मिलान येथे हवामान बदलावर ओबामा यांनी भाषण केले. त्यानंतर व्हाईट हाऊसचे माजी शेफ सॅम कास यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी व्हाईट हाऊसमधील कोणत्या गोष्टींची त्यांना आठवण येत नाही, असे त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर ओबामा म्हणाले, की ही यादी खूप मोठी आहे परंतु अध्यक्ष म्हणून जाणवणारे एकटेपण ही त्यातील पहिली गोष्ट आहे.

“तुम्ही एका बुडबुड्यात जगता आणि तो खूप छान तुरुंग असतो. त्यामुळे सहज चालत जाण्याचे किंवा कॅफेत बसण्याचेही स्वातंत्र्य मला नसते,” असे ते म्हणाले.
“आता मी सेल्फीचा बंदी बनलो असून तेही तेवढेच वाईट आहे. जोपर्यंत प्रत्येक दोन पावलांवर सेल्फी घेता येईल तोपर्यंत मी कितीही लांब चालत जाऊ शकतो,” असे ओबामा पुढे गमतीने म्हणाले.


यावर अधिक वाचा :