testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाकिस्तानला अमेरिकेची आर्थिक मदत बंद

Last Modified शनिवार, 22 जुलै 2017 (17:14 IST)
अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी ३५ कोटी डॉलरची मदत न देण्याचा निर्णय घेतला आहे. हक्कानी नेटवर्क या दहशतवादी गटाविरोधात इस्लामाबादने योग्य पाऊल उचलल्याची मी पुष्टी देऊ शकत नाही, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान स्थित हक्कानी नेटवर्कवर अफगाणिस्तान, अमेरिका आणि काही पाश्चिमात्य देशांवर हल्ले केल्याचे आरोप आहेत. या दहशतवादी गटावर काबूलमध्ये भारतीय दुतावासावर २००८ मध्ये बॉम्बस्फोटसह अफगाणिस्तानमधील भारतीय हितांविरोधात अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे आरोप आहेत. वर्ष २००८ मधील बॉम्ब हल्ल्यात ५८ लोक ठार झाले होते.


यावर अधिक वाचा :