शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

आता ‘रोबोट’ पत्रकार

चीनमधील बीजिंग युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकाच्या गटाने  एक ‘रोबोट’ पत्रकार तयार करण्यात आला आहे. या रोबोट पत्रकाराचं नाव आहे झाओ नान. या रोबोटने नुकतंच एक ३०० शब्दांचा लेख लिहून पूर्ण केला.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा लेख या रोबोटने एका सेकंदात लिहित पूर्ण केला. हा लेख सदर्न मेट्रोपोलीस डेली या तिथल्याच एका पेपरमध्ये छापून आलाय.तिथल्या सणासुदीच्या काळात तिथे होणाऱ्या गर्दीवर हा लेख या रोबोटने लिहिला आहे.हा रोबोट सध्या लहान आणि विस्तृत असे दोन्ही प्रकारचे न्यूज रिपोर्ट तयार करू शकतो.