शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पोर्तुगाल , शनिवार, 29 जुलै 2017 (13:07 IST)

पन्नाशीनंतरही महिलांसाठी सेक्स आवश्यकच!

वयाच्या पन्नाशीनंतरही महिलांना सेक्स आवश्यक असल्याचा निकाल युरोपमधील सर्वात मोठ्य मानवी हक्क न्यायालयाने दिला आहे. पोर्तुगालमधील मारिया इवोने कारवाल्हे डी सूजा या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्तवपूर्ण निकाल दिला. शस्त्रक्रियेनंतर सामान्य आणि लैंगिक जीवनात समस्या निर्माण होत असल्याने मारिया यांनी रुग्णालयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी मानवी हक्क न्यायालयाने महत्तवपूर्ण निकाल दिला. मारिया यांच्यावर वयाच्या 50व्या वर्षी एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 1995मध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर दैनंदिन आणि लैंगिक जीवनात अनेक अडचणी येत असल्याचे म्हणत मारिया यांनी पोर्तुगालमधील न्यायालयात रुग्णालयाविरोधात खटला दाखल केला.