testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राणी एलिझाबेथ २ कडून श्यामक डावर चे विशेष कौतुक

shamak dabar
मुंबई| Last Modified शनिवार, 4 मार्च 2017 (09:16 IST)
ब्रिटन ची राणी एलिझाबैथ 2 यांच्याकडून प्रसिद्ध कोरिओग्राफर व गायक श्यामक डावरला बकिंगहम पॅलेसमध्ये नुकताच आयोजित केलेल्या युके-इंडियन कल्चर लॉंच इव्हेंटसाठी खास आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी राणी एलिझाबेथ 2 यांनी दोन्ही देशांतल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीबद्दल चर्चा केली तसेच श्यामकच्या टीमचे कौतुकही केले. ९० वर्षाच्या चिरतरुण राणी एलिझाबेथ यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्या डौलदार व मोहकतेचा अनुभव घेता आल्याचं यावेळी श्यामकने व्यक्त केलं.

ह्या कार्यक्रमाला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली, कपिल देव, कमल हसन, सुरेश गोपी, गायक गुरुदास मान , फॅशन डिझायनर मनीष अरोरा व मनीष मल्होत्रा, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. ह्या सर्वांनी श्यामक च्या नृत्यकौशल्याचे कौतूक केले.

विशेष म्हणजे यावेळी श्यामकच्या आई देखील उपस्थित होत्या. श्यामक व त्याच्या टीमने ड्युक व डचेस ऑफ कॅम्ब्रिजच्या कार्यक्रमात प्रिन्स विल्यम व केट मिडलटोन यांच्या भारत दौ-यात आपला परफॉर्मन्स दिला होता, तो अजूनही त्यांच्या लक्षात असून त्यांनी याबद्दल श्यामकचे कौतुकही केले. श्यामकच्या या कामगिरीमुळे भारतीयांना नक्कीच त्याचा अभिमान वाटेल.


यावर अधिक वाचा :