शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 मे 2018 (09:27 IST)

अपघातानंतर 'ओ' रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक

ओ रक्तगटच्या लोकांना जागतिक दाता म्हणून ओळखले जात असले तरी  या रक्तगटाच्या रूग्णांसाठी आता एक महत्त्वाची गोष्टी संशोधनातून समोर आली आहे. अपघातानंतर ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असतं असे संशोधनातून समोर आलं आहे.  बायोमेड सेट्रलच्या संशोधन अहवालामध्ये ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची बाब उघडकीस आली आहे. सुमारे 901 जॅपनीज आपत्कालीन रूग्णांमधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.  

संशोधनातून समोर आलेल्या अहवालामध्ये गंभीर अपघातामध्ये ओ पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये अपघातानंतर अपंगत्व  येण्याची किंवा मृत्यूची शक्यता दाट असते. यामध्ये इतर रक्तगटाच्या रूग्णांच्या तुलनेत ओ रक्तगटातील रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण  28 % अधिक आहे.  अपघातानंतर मृत्यू होण्यामागे अति रक्तस्त्राव होणं हे एक महत्त्वाचं कारण मानल जातं. इतर रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये ब्ल्ड क्लॉटिंग घटक कमी असतात.