शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सावध! ही 'पेंटिंग' लावल्याने घरात पसरतं मातम

लंडन- दुनियेत काही वस्तू शापित मानल्या जातात आणि लोकं अश्या वस्तूंपासून दूर राहतात. अशीच एक पेंटिंग आहे ज्यात एक मासूम मुलाचा चेहरा बनलेला आहे, ज्या घरात ही पेंटिंग असते तिथे मातम पसरून जातं.
 
उल्लेखनीय आहे की रडत असलेल्या या मुलाची पेंटिंग 1985 मध्ये इटली येथील प्रसिद्ध आर्टिस्ट जियोवनी ब्रागोलिन ने तयार केली होती, परंतु त्यांना याची कल्पना नव्हती ते काय तयार करत आहे? पेंटर फक्त ही पेंटिंगच नव्हे तर 1950 पासून या प्रकारच्या पेंटिंगची सीरीज तयार करत आहे.
 
लोकंही आवडीने ही पेंटिंग आपल्या घरात सजवत होते परंतू मग सुरू झाली घटनांची एक लांब मालिका. द सन वृत्तपत्राच्या रिर्पोटप्रमाणे एका फायर-फाइटरने ही गोष्ट उघडकीस आणली की ज्याही घरात ते आग विझविण्यासाठी पोहचले तिथे ही पेंटिंग लावलेली होती.
 
'द क्राइंग बॉय' ची पेंटिंग त्या प्रत्येक घरात मिळाली जिथे आग पेटली होती. घरातील सर्व सामान जळाले तरी पेंटिंग जळली नाही. सतत अश्या घटनांमुळे पेंटिंग शापित असल्याचे कळून आले. लोकांनी हे पेंटिंग घरात लावणे बंद केले. आणि संयोग बघा त्यानंतर अपघातही कमी होऊ लागले.