शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 24 जुलै 2017 (07:58 IST)

इंग्लंडमध्ये ही भारतीय महिला आहे जेलर

जर जेल पुरुषांचं आणि जेलर महिला असेल तर प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होऊन बसतो. पण, घर, व्यवसाय, नोकरी, मुलं अशी चौफेर आघाडी अगदी सहज पेलणाऱ्या भारतीय महिला हेही शक्य करून दाखवू शकतात, नव्हे तर दाखवलेलं आहे. इंग्लंडमधील रिसले इथल्या पुरुष कारागृहावर भारतीय वंशाच्या पिया सिन्हा जेलर म्हणून काम पाहतात.
 
पिया सांगतात की, ‘मी २० वर्षांपूर्वी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मी विविध महिला आणि पुरुष कारागृहांमध्ये जेलर म्हणून काम पाहिलं. तिथे असणाऱ्या अनेक समस्या मी सोडवल्या आहेत.’ इथली प्रमुख समस्या म्हणजे कैद्यांचे ड्रग्जमुळे होणारे मृत्यू. याखेरीज कैद्यांना वाटणारी असुरक्षितता, त्यामुळे कैद्यांचं आक्रमक होणं, तुरुंगातील इतर सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांना पिया यांनी हुशारीने सोडवल्या आहेत.
 
इथल्या जेलमध्ये सर्वच यंत्रणा अद्ययावत असल्यामुळे ड्रग्जचा व्यापार इथे सहजतेने करता येतो. ड्रोनमुळे ड्रग्ज सहजतेने जेलमध्ये पोहोचवता येतात. पण, मी इथे ड्रोनच्या संचाराला बंदी केली आहे. त्यामुळे ड्रग्ज घेऊन मरणाऱ्या कैदींची संख्या इथे शून्य झाली आहे. मला एक स्त्री म्हणून इथे काम करण्यात कोणताही धोका वाटत नाही, असं पिया सांगतात.