मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ती झाड बनतेयं

बांगलादेशातील एक लहान मुलीच्या चेहर्‍यावर आणि कानावर झाडांच्या फाद्यांसारखी विद्रुप त्वचा बाहेर पडत आहे. तिच्या चेहर्‍याकडे पाहिल्यास सर्वांनाच भीती ‍वाटते. सध्या ही मुलगी जगातील पहिली ट्री-वुमन ठरली आहे. ही मुलगी ट्री मॅन सिंड्रोम म्हणजे एपिडमॉडिसप्लसिया वेरूसीफोर्मिस नावाच्या त्वेच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. या आजाराने आतापर्यंत कोणतीच महिला आजरी नव्हती, म्हणून ही लहान मुलगी जगातील पहिली ट्री-वुमन बनली आहे.
 
या मुलीचे नाव शहाना मोहम्मद शहजहॉ असे असून तिचे वडील मोहम्मद हे बांगलादेशातील एका गावात मजुरीचे काम करतात. गेल्या चार महिन्यांपासून शहाना या आजाराने त्रासलेली आहे असे मोहम्मद यांनी सांगितले. शहाना लहना असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला. आता तिची काळजी घ्यायला दुसरे कोणी नाही म्हणूनच ती लवकरात- लवकर बरी व्हावी अशी इच्छा मोहम्मद यांनी व्यक्त केली आहे.
 
शहानाच्या या गंभीर आजाराबद्दल डॉक्टरांनी सांगितले की शहानाचा आजार हा प्राथमिक टप्यात असून तो बरा होऊ शकतो. तसेच या आजराने त्रस्त असलेला आणखी एक रूग्ण असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.
 
आतापर्यंत त्याच्यावर 16 वेळा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या काही महिन्यांत या आजारापासून त्यांची सुटका होणार आहे. तसेच वेळोवेळी उपचार केल्यास शहानादेखील लवकर बरी होईल, असे डॉक्टर म्हणाले.