गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

#webviral सर्पदंशाचा याच्यावर नाही होत परिणाम

साप नावानेच लोकं घाबरतात परंतु 37 वर्षाचा टिम फ्रिडे याला सापाची मुळीच भीती वाटत नाही. वयाच्या 16 वर्षात त्याला 160 वेळा साप दंश मारून चुकले आहे पण त्यावर काही परिणाम होत नाही. टिमचा हाच कमाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटो सौजन्य : सोशल मीडिया 
 
टिम स्वत: सापाकडून दंश मारवून घेतो. तो वैज्ञानिक असून सापाविषयी जाणून घ्याचे हा त्याचा ध्येय आहे. टिम सापाचे विष आपल्या शरीरात कुचकामी करू इच्छितो. यामागे त्याचा हेतू असे औषध तयार करण्याचे आहे ज्याने सापाच्या विषामुळे होणारी मृत्यू टाळता यावी.
 
टिम फ्रिडेचा हा छंद त्याचा पत्नीला मुळीच आवडत नसल्यामुळे ती लग्न मोडून निघून गेली. फ्रिडेला टाइपन आणि ब्लॅक मांबा सारखे सापही दंश मारून चुकले आहे. हे दोन्ही साप दुनियेतील सर्वात विषारी प्रजातीचे साप आहेत. फ्रिडेवर यांच्या विषाचाही काही प्रभाव पडला नाही. 2011 मध्ये फ्रिडेला कोब्रा सापाने दंश मारला होता. ‍त्याच्या पहिल्या दंशाचा काही प्रभाव पडला नव्हता पण दुसर्‍याला दंश मारल्यावर तो कोमात गेला होता.