testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या देशात पत्नीचा वाढदिवस विसरणे म्हणजे गुन्हा!

पत्नीचा वाढदिवस विसरण्यावर खूप विनोद होत असतात. पण एक देश असा आहे जिथे पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. जगात असे अनेक देश आहेत जिथे विचित्र कायदे आहेत. त्यापैकी एक देश म्हणजे सामोआ. दोन लाख लोकसंख्या असलेला हा बेटवजा देश. या देशात विचित्र कायदा म्हणजे नवर्‍याने बायकोचा वाढदिवस विसरणे कायद्याने गुन्हा मानला आहे.
या कायद्यामागील कारणही विचित्र आहे. येथे पती वाढदिवस विसरला म्हणून पत्नीने त्यावर हल्ले केल्याच्या अनेक घटना येथे घडल्या. या प्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर हे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या देशात एखादा नवरा त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याने गुन्हा केला असे मानले जाते. त्यामुळे येथील नवर्‍यांना कायद्याच्या भीतीने बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवणे गरजेचे असते.


यावर अधिक वाचा :