testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी काढल्याने महिलेचा घटस्फोट

trump selfie
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्याचे चर्चेत येण्याचे कारण भलतेच असून एका महिलेने आपल्या घटस्फोटासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे.
फ्लोरिडामधील पाम बीच काउंटी येथे राहणार्‍या लिन आणि डेव्ह अॅरॉनबर्ग यांचा गेल्याच आठवड्यात घटस्फोट झाला आहे. लिन एक चिअरलिडर राहिली असनू तिचा पती डेव्ह अॅरॉनबर्ग एक प्रतिष्ठित वकील आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे तसेच रिपब्लिकन पक्षाशी संबंधित मुद्याचे समर्थन केल्याने आपला घटस्फोट झाल्याचा दावा लिन यांनी केला आहे.

घटस्फोटनंतर पोटगीमध्ये एक बीएमडब्ल्यू कार आणि हजारो डॉलर्स मिळाल्याचे लिन यांनी जारी केलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :