गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: काबूल , बुधवार, 16 एप्रिल 2014 (12:54 IST)

अफगाणिस्तानात उपमंत्र्यांचे अपहरण

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काही अज्ञात बुंदूकधार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम उपमंत्री अहमद शाह वाहिद यांचे अपहरण केले आहे. याशिवाय लिबियामधील जॉर्डनचे राजदूत यांचेही अपहरण झाल्याचे समजते. त्रिपोलीत काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांचे अपहरण केली. या घटनेत वाहन चालक जखमी झाला आहे. 

काबूलचे पोलिस गुल आगा हाशिम यांनी सांगितले, की उपमंत्री अहमद शाह हे कामानिमित्त उत्तर काबूलसाठी निघाले होते. मात्र काही अंतरावर पाच बंदूकधार्‍यांनी त्यांच्या  कारवर गोळीबार केला. त्यात चालक जखमी झाला. त्यानंतर बंदुकधार्‍यांनी वाहिद यांचे अपहरण केले. 

उपमंत्री वाहिद यांच्या अपहरणकर्त्यांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे प्रवक्ता सोहेल काकर यांनी सांगितले आहे. 50 वर्षीय वाहिद यांनी इटलीमधून स्थापत्य तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. चार वर्षांपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमंत्री आहेत. वाहिद यांचा कोणाशीही वाद नसल्याचे काकर यांनी सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानात पैशांसाठी अपहरणाच्या घटनेत वाढ झाली आहे.

दुसरीकडे, उपमंत्री वाहिद यांच्या अपहरणाशी काही संबंध नसल्याचे तालिबानीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.