शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (10:55 IST)

अमेरिका देणार पाकला लढाऊ विमाने

संसदेतील अनेक सदस्यांचा जोरदार विरोध झुगारुन अमेरिका पाकिस्तानला एफ-16 या जातीची लढाऊ विमाने देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या भूमिकेमुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला बळ मिळावे यासाठी ही विमाने देण्यात येत असल्याचा युक्तीवाद सरकारचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अनेकदा सांगूनही पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी संघटनांवर ठोस कारवाई केली नसल्याने त्यांना विमाने देऊ नयेत, असे काही खासदारांचे म्हणणे होते. तसेच, पाकिस्तान सरकारमधील काही अधिकार्‍यांच्या मदतीने दहशतवादी मुक्तपणे पाकिस्तानात फिरत असतात, असेही त्यांनी सरकारला कळविले होते. मात्र, अमेरिका सरकारने पाकिस्तानला मदत करण्याचा आपला निश्चय पक्का असल्याचे स्पष्ट केले आहे.