शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (11:44 IST)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मुस्लिम लायक नाहीत!

मुस्लिमांची श्रद्धा असलेला इस्लाम धर्म हा अमेरिकेच्या मूलभूत मुल्यांशी सुसंगत नसल्याने मुस्लिम नागरिकाने अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनु नये, असे विधान येथील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बेन कार्सन यांनी केले आहे.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची श्रद्धा ही या देशाच्या राज्यघटनेच्या विरोधी असता कामा नये, असे स्पष्ट मत कार्सन यांनी व्यक्त केले. या देशाचे नेतृत्व एका मुस्लिमाच्या हाती दिले जाऊ नये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे एका मुस्लिम नागरिकाच्या हाती देण्यास माझा पाठिंबा कधीच नसेल, असे कार्सन म्हणाले.