शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

एक दिवसात 100 वेळा चरम सुख, तरी दुखी

ही गोष्ट आपल्याला गंमत वाटू शकते पण दो मुलांचे वडील डेल डेकरसाठी ही गोष्ट दुःखद आणि लाजिरवाणी आहे. ते निराश असतात आणि या नको असलेल्या सुखामुळे अस्वस्थ असतात.
 
डेल डेकर निरंतर परसिसटेंट जेनिटल अराउज़ल सारख्या रोगामुळे ‍त्रस्त आहे. हे विश्वातील पहिले असे व्यक्ती आहे ज्यांनी ही गोष्ट सार्वजनिकपणे स्वीकारली आहे. डेलला हा रोग 2012 साली तेव्हा जाणवला जेव्हा खुर्चीवरून उठताना त्यांना स्लिप डिस्क झाला. त्यांना हॉस्पिटल नेत असताना 5 वेळा ऑर्गेज्म जाणवलं.
 
पुढे पहा व्हिडिओ

डेलने सांगितले की हे निरंतर होत असतं, इतकं की झोपेतही. एका व्हिडिओत डेलने सांगितले की जेव्हा ते आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार करत होते तेव्हाही नऊ वेळा त्यांना या परिस्थितीला समोरा जावं लागलं. अशावेळी ते दोन्ही हात जमिनीवर टेकून बसून जातात. एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यावर निरंतर होत राहते.


ते सतत घरातच राहतात आणि अशाने कुटुंबात ताण निर्मित होतो. अमेरिकेत राहणारे डेल आपल्या बायको आणि दोन मुलांसोबत राहतात. या रोगामुळे त्यांचे मित्र, नातेवाईक त्याच्यापासून दूर राहतात आणि मुलांशी त्यांचे संबंध सहज नाही.
 
डेलची बायको एप्रिलने सांगितले की डेल सामान्य माणसासारखे वागू शकतं नाही. त्यांचा लिंग नेहमी इरेक्शनच्या स्थितीत असतं. कधी-कधीतर चार-चार तास हे चालू असतं आणि दिवसातून 30 ते 40 वेळा निरंतर होत राहतं. कधी-कधी तर ही संख्या 100 पर्यंत पोहचते. डेल आणि एप्रिल सेक्स करूच पात नाही कारण त्यांच्या सेक्सला पूर्णता येतच नाही.
 
37 वयाचे डेलचे जीवन यामुळे पूर्णपणे बदलून गेले आहे. ते म्हणतात याने त्यांना शारीरिक सुख तर लाभतं पण मनातून याची खूप लाज वाटते.