गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: काठमांडू , सोमवार, 27 एप्रिल 2015 (10:51 IST)

काठमांडून मुसळधार पावसाची शक्यता

जबरदस्त भूकंपानंतर काठमांडूत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने बचावकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यातच अजूनही भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

भूकंपानंतर नेपाळ सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. मदत पथके ढिगाºयाखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. नव्या धक्क्यांमुळे, तसेच वादळी हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. रविवारी बसलेल्या धक्यांमुळे त्रिशुली हैडल प्रकल्पातील एक बोगदा खचला असून, त्यात ६० कामगार दबले आहेत. त्यांना वाचविण्यासाठीही मदत कार्य सुरु झाले आहे.