शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पॅरिस , सोमवार, 5 जानेवारी 2015 (11:25 IST)

कारची होळी करुन नवर्षांचे स्वागत

जुन्या कारची ‘होळी’ करुन अर्थात त्या जाळून नववषार्चे स्वागत करण्याचा अनोखा प्रकार पॅरिससह इतर शहरात करण्यात आला.
 
फ्रेंच नागरिकांसाठी नववर्षानिमित्त जुन्या कार जाळणे आजही प्रतिष्ठेचे मानले जाते. २०१३ ला निरोप देताना फ्रान्समध्ये एक हजार ६७ जुन्या कार जाळण्यात आल्या होत्या. गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कार जाळण्याच्या प्रमाणात घट झाली असली तरी हा प्रकार थांबलेला नाही.