शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2013 (17:23 IST)

कुटुंबीय व श्वानांचेही लैंगिक शोषण करायचा हा शिल्पकार

FILE
विसाव्या शतकातील ब्रिटनमधील प्रसिद्ध शिल्पकार एरिक गिल आपल्या पाळीव श्वानांसहित स्वत:च्या कुटुंबीयांचेही लैंगिक शोषण करत होता, असे स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनमध्ये लैंगिक शोषितांच्या हिताचे रक्षण करणारी संघटना 'द सरवायवर्स ट्रस्ट'च्या कार्यकर्त्यांनी एरिक विरूद्ध मोहीम छेडली असून सार्वजनिक ठिकाणी त्याच्या कलाकृतींचे दर्शन अपमानजनक असून ते पीडितांची अवहेलना केल्यासारखे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एरिकने शेक्सपिअरचे नाटक 'द टेम्पेस्ट' पासून प्रभावित होऊन 'प्रॉसपेरो' व 'एरियल' ही दोन शिल्प बनवली होती. लंडनमधील बीबीसीच्या प्रसारण भवनाच्या मुख्य द्वारावर ती शिल्पे लावण्यात आली आहेत.

इतिहासकारांच्या मते एरिक आपली बहीण व दोन मुलींचे लैंगिक शोषण करत होता. त्याच्या मृत्यूनंतर १९८९ मध्ये प्रकाशित झालेल्या डायरीतून तो कुटुंबीयांशिवाय पाळीव श्वानांचेही लैंगिक शोषण करत होता, असे स्पष्ट झाले होते.

एरिक नग्न शिल्प घडवण्यासाठी मुलगी पेट्रा हिचा मॉडेल म्हणून उपयोग करायचा. त्याने लंपटपणाचा कळस गाठला होता व निर्वस्त्र शिल्पांसाठी आलेल्या मॉडेल्स सोबत तो नेहमीच लैंगिक संबंध साधायचा.