गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (13:29 IST)

केवळ दोन बटनांवर चालते google ची ’ड्रायव्हरलेस कार’

सध्या संपूर्ण जगात ज्या गॅझेटची चर्चा सुरू आहे ते गॅझेट म्हणजे गुगलची ड्राइवरलेस कार. ही कार अजूनपर्यंत लोकांसमोर आलेली नाही, मात्र ही ड्रायव्हरलेस कार चालवण्याची परवानगी अमेरिकेच्या चार राज्यांनी दिली आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत जवळपास 200 प्रोटोटाईप कार्स रस्त्यांवर येतील, जेथे यांचा वास्तव परिस्थितीशी सामना होईल. 600 फुटांच्या अंतरामध्ये थ्रीडी प्रतिरूप बनवून ही कार रस्ता शोधते.

360 डिग्री फिरणारे सेन्सर 600 फूट अंतरापर्यंतची थ्रीडी इमेज तयार करतात. रडार आणि व्हिडीओ कॅमेरा कारला वेग आणि सिग्नल सांगतो. व्हील सेन्सर कारला फिरणे आणि ठिकाण सांगतो. पावरफुल प्रोसेसर हे कारला प्रत्येक बाबीबद्दल माहिती पुरवते. वाइडस्क्रीन ही काचेची नसून प्लास्टीकने बनलेली आहे.

सॉफ्ट फोमने बनलेल्या फ्रन्ट बॉडीमुळे जरी ही कार कोणाला धडकलीच तर ती व्यक्ती जखमी होणार नाही. कारमध्ये दोन बटने आहेत. त्यातील एक स्टॉपसाठी आणि दुसरे गो साठी.

गाडीत कोणतीच स्टेअरिंग नाही, ब्रेक नाही, एक्सीलेटर नाही आणि गिअरही नाही. जास्तीत जास्त वेग 40 किमी प्रति तास (केवळ शहरात चालवण्यासाठी योग्य).गुगलचा असा विश्वास आहे की, ही ड्रायव्हरलेस कार धडकण्याची शक्यता 90% कमी होईल. एपिल्र 2014 पर्यंत ही कार कोणत्याही अपघाताशिवाय 7 लाख किमी चालली आहे. या कारचे मॅन्युअली चालवले असता दोन अपघात झाले.