गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: ढाका , गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (13:10 IST)

खालिदा झिया यांना अटकेचे आदेश

बांगलादेशातील न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीस वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना अटक करण्याचे आदेश आज दिले आहेत. विशेष न्यायाधीश अबू अहमद जामदार यांनी याबाबत वॉरंट जारी केले. झिया अनाथालय ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सुनावणी करीत असून या दोन्ही प्रकरणांत माजी पंतप्रधान व त्यांचे फरार पुत्र तारिक रहमानसह इतर आठ जण आरोपी आहेत.