शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (17:07 IST)

गिलानी यांच्या विरोधात अटक वॉरंट

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या विरोधात येथील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. राष्ट्रीय विमान कंपनीमधील घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी न्यायालयात होत असलेली सुनावणीदरम्यान गिलानी यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. 
 
न्यायालयाने पुढील सात दिवसांमध्ये गिलानी यांना अटक करून कारागृहात टाकण्याचे आदेश दिले आहेत.