शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :कॅलिफोर्निया , गुरूवार, 30 एप्रिल 2015 (17:52 IST)

गुगलवर सनी लियॉनवरच ‘उड्या’

भारतासह जगभरात जाईल त्या ठिकाणी डंगा माजविणारे नरेंद्र मोदी गुगलवरील अनौपचारीक स्पर्धेत चक्क सनी लियॉनच्या मागे पडले आहेत. गुगलवर भारतामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सनी लियॉन हिला अधिक वेळा शोधण्यात आल्याचे गुगलने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 
जगातील प्रत्येक देशातून शोध घेण्यात आलेल्या गोष्टींबाबतची सविस्तर माहिती गुगलने प्रकाशित केली आहे. सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या व्यक्तींची यात माहिती आहे. मोदी यांना २०१३ मध्ये सर्वाधिक वेळा शोधण्यात आले होते. मात्र यावर्षी मोदी यांच्यापेक्षा सनी लियॉन हिला भारतामधून अधिक वेळा शोधण्यात आल्याचे पुढे आले आहे.  गतवर्षी ‘टॉप टेन’ व्यक्तींच्या शोधामध्ये सोनिया गांधी, राहूल गांधी, मनमोहन सिंग यांना स्थान मिळालेले नव्हते.