गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (09:26 IST)

घर विकून पतीला शिकवला धडा

आपल्या धोकेबाज पतीला धडा शिकवण्यासाठी लंडनमधील एका महिलेने वेगळाच फंडा वापरला. व्यवसायानिमित्त पती अमेरिकेला गेल्याने त्याच्या अनुपस्थितीत पत्नीने तिचे घर विकून टाकले आणि ती नवीन ठिकाणी राहायला गेली. घर विकण्याबाबत तिने आपल्या पतीला काही कळूही दिले नाही. पती अमेरिकेहून परत आल्यानंतर घराला लागलेले नवे टाळे पाहून तो चक्रावला. इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, लंडनमध्ये राहणारा बिल्डर क्रेग अर्नाेल्ड व्यवसायानिमित्त न्यूयॉर्कला गेला होता. त्यादरम्यान तो मोबाईल घरी विसरला. याचवेळी नेमका त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा मेसेज आला. न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर क्रेगचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला जाईल. त्याला निराश करणार नाही, असे त्या मेसेजमध्ये लिहीले होते. नेमका हा मेसेज के्रगची पत्नी लॉराने वाचला. मेसेज वाचल्यानंतर लॉराने आपल्या धोकेबाज पतीला धडा शिकवण्याचे ठरवले. जेव्हा के्रग व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेला असताना क्रेगची पत्नी लॉराने सर्व व्यवहार पूर्ण करुन घर विकून टाकले. क्रेग घरी परतला तेव्हा आपल्या घरी नव्या लोकांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यावेळी आपल्या पत्नीने घर विकल्याचे त्याला समजले.