गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (15:43 IST)

चिनी राष्ट्रपतीची लव्हस्टोरी इंटरनेटवर सुपरहिट

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि त्यांची सेलिब्रिटी पत्नी पेंग लियुआन यांची लव्हस्टोरी असलेला एक म्युझिकल व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अवघ्या एका आठवडय़ाच्या अल्पावधीत शी जिनपिंग आणि पेंग लियुआन यांचा हा व्हिडिओ 2.2 कोटी युजर्सनी पाहिला आहे.
 
शी जिनपिंग आणि पेंग लियुआन या दोघांनी भारत दौर्‍यात गुजरातमधील साबरमती नदीच्या किनार्‍यावरील आश्रमात काही काळ घालवला होता. यावर आधारित हा रोमॅटिक व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर धूम करत आहे. बहुतांश मीडियानेही तो प्रसारित केला आहे. ‘शी दादा लव्ज पेंग ममा’ नामक व्हिडिओने जगभरातील कोटय़वधी युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
3 मिनिट 21 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जिनपिंग दाम्पत्याची 33 छायाचित्रे स्लाइडशोमध्ये दाखवण्यात आली आहेत. यापैकी दोन छायाचित्रे अशी आहेत की, शी जिनपिंग आणि पेंग लियुआन डोळ्यांच्या भाषेतून संवाद साधताना दाखवण्यात आले आहे.