शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (11:58 IST)

चिनी सैनिकांची आता नव्या मार्गाने घुसखोरी

लडाखमधील चुमार भागात चिनी सैनिकांनी शनिवारी पुन्हा एकदा नव्या मार्गाने घुसखोरी केली आहे. गेल्या आठवडय़ाभरात चिनी सैनिकांनी दुसर्‍यांदा घुसखोरी केली आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सुमारे 50 सैनिक चुमार भागातील ‘पॉइंट 30-आर’ क्षेत्रात काही वाहनांतून नव्या मार्गाने आले आहेत. याठिकाणी अगोदरपासूनच चीनचे 35 जवान तळ ठोकून आहेत. चुमार हे लडाखपासून ईशान्येकडे 300 किमी   अंतरावर आहे. चीनचे हे सैन्य भारतीय लष्करापासून सुमारे 100 मीटर अंतरावर आहे. 
 
गुरुवारी रात्री चीनचे सैनिक भारतीय हद्दीतून परत गेल्यानंतर भारतीय जवानही त्या भागातून परतले होते. आता चिनी सैन्याने पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे.