शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|
Last Modified: वॉशिंग्टन , सोमवार, 29 ऑक्टोबर 2007 (12:44 IST)

चुंबनप्रकरणी शिल्पा शेट्टीकडून निषेध करणाऱ्यांचा निषेध

हॉलीवूडचा अभिनेता रिचर्ड गेअर याने घेतलेल्या चुंबनाचा लोकांनी निषेध केल्यानंतर आता शिल्पाने लोकांना फाट्यावर मारले आहे.

दिल्लीत एड्सविषयी जनजागृतीच्या एका कार्यक्रमात रिचर्ड गेअर आला होता. तेथे शिल्पा शेट्टीला बोलाविण्यात आले होते. त्यावेळी रिचर्डने शिल्पाचे जाहीररित्या चुंबन घेतले होते. त्यामुळे पारंपरिक भारतीय समाजात संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी या चुंबनाचा निषेध रिचर्ड व शिल्पा यांचे पुतळे जाळून केला होता. या निषेधकर्त्यांचा उल्लेख शिल्पाने मुर्ख या शब्दांत केला आहे.

लोकांच्या या प्रतिक्रियेने आपल्याला धक्का बसला होता. याचा केवळ राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्याचा काही मुर्खांचा डाव होता, अशा शब्दांत त्यांनी या लोकांवर टीका केली आहे. अनेक भारतीयांना हे आवडले नाही. हे मला मान्य आहे. पण मीही नव्या पिढीची प्रतिनिधी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे दुःख झाले. यानंतर शिल्पाविरूद्ध सार्वजनिक सभ्यतेचा नियम मोडल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. अर्थात सर्वोच्च न्यायलयाने तिच्यावरील सर्व आरोप काढून टाकले होते.