शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :श्रीनगर , शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (12:56 IST)

'जीवे-जीवे पाकिस्तान' म्हणणारा मसरत आलम अरेस्ट

पाकिस्तानसाठी नारेबाजी करणारा फुटीरतावादी नेता मसरत आलमला अटक करण्यात आले आहे. मसरतला श्रीनगरच्या शहीदगंज ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मसरतच्या अटकेबाबत राज्य सरकारावर बराच दबाव होता आणि भाजप सतत निशाण्यांवर होती. देशात विरोधी प्रदर्शन करणारा आरोपी फुटीरतावादी नेता मसरत आलम आणि अली शाह गिलानीला आधी जम्मू काश्मीर सरकारने नजरबंद केले होते.  
 
मसरतच्या अटकेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे की फुटीरतावाद आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कुठलेही समझोते केले नाही आणि करणार ही नाही. ही युती सिद्धान्तांच्या समजोतेवर नव्हती केली. आम्हाला विश्वास आहे की येणार्‍या काळात दोन्ही गट कॉमन मिनिमन प्रोग्रॅममध्ये कामं करतील.  
 
तसेच पँथर्स पक्षाचे भीम सिंग यांनी म्हटले की याचे क्रेडिट मीडियाला जातं ज्यांनी सामान्य लोकांच्या आवाजाला समोर आणले आहे. ही  भाजप आणि मुफ्तीची मजबूरी आहे. आता बघायचे असे आहे की कुठल्या धारांमध्ये अटक करण्यात आले आहे. तसेच भाजप नेता राम माधव यांनी म्हटले की मसरतला अटक करण्यात काहीच वेळ लागला नाही. एक प्रोसेस असतो, कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता आणि वेळेवर अॅक्शन घेण्यात आली.