गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ट्विटरने बंद केली दहशतवाद्यांशी संबंधित 1.25 लाख खाती

वॉशिग्टन- ट्विटरने दहशतवाद्यांना मोठा धक्का दिला आहे. दहशतवाद्यांशी संबंधित किंवा दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 1. 25 लाखाहून अधिक खाती ट्‌विटरने बंद केली आहे. यामधील अधिकांश अकाउंट इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनांशी जुडलेले होते.
 
ट्विटरने एका ब्लॉगद्वारे म्हटले की दहशतवादाचा धोका वाढला आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्या कामात बदल केले आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 1. 25 लाखापेक्षा अधिक ट्विटर अकाउंट्सआम्ही बंद केली आहेत. 
 
दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी ट्‌विटर वापरण्याचा आम्ही नेहमीच निषेध करतो. संशयास्पद कृती आढळून आल्यावर आम्ही खाते बंद करतो, असे कंपनीद्वारे स्पष्ट केले गेले आहे.