शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2016 (15:35 IST)

दक्षिण कोरिया सरकारची नागरिकांना अनोखी ऑफर

दक्षिण कोरियाच्या सरकारने त्यांच्या नागरिकांना जादा मुले जन्माला घाला आणि सरकारी नोकरी मिळवा अशी खुल्ली ऑफर दिली आहे. 
 
मुले जन्माला घालण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सरकार अनेक योजना जाहीर करत आहे कारण या देशाचा जन्मदर सातत्याने घसरत चालला आहे. 1960 पासून जन्मदराची ही घसरण सुरूच असून जन्मदर वाढावा यासाठी सरकारने आतापर्यंत करोडो डॉलर्स खर्च केले आहेत मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होताना दिसलेला नाही. 
 
बीबीसीच्या अहवालानुसार आरोग्यमंत्री जंग चिन यू यांनी सांगितले की जन्मदर वाढावा यासाठी अनेक योजना जाहीर केल्या गेल्या आहेत. प्रजनन समस्या असणार्‍यांसाठी सरकार उपचार करून घ्यावे म्हणून आर्थिक मदत करत आहे. ही योजना आतापर्यंत आर्थिक दुर्बलांसाठी होती ती आता सर्वासाठी खुली केली गेली आहे. दुसरे मूल झाल्यावर पुरूषांना मिळणारी सुटी वाढविली गेली आहे. प्रजनन समस्यांवर उपचार घेणार्‍यांना तीन दिवस सुटी दिली जात आहे तर तीनपेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सार्वजनिक पाळणाघराची सुविधा दिली गेली आहे. 
 
यावर्षी पहिल्या पाच महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत जन्मदर 5.3 टक्क्यांनी घसरला आहे. देशातील विचारवंतांच्या मते कार्पोरेट संस्कृतीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. नोकरदारांना तासन्तास काम करावे लागते व त्यामुळे मुलांच्या देखभालीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे मुले जन्माला न घालण्याकडेच नागरिकांचा कल वाढला आहे.