शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: क्वालालंपुर , रविवार, 30 नोव्हेंबर 2008 (16:18 IST)

दहशतवादाविरोधात भारताला सहकार्य- मलेशिया

मुंबईतील हल्ल्यांमध्ये सहभागी झालेल्या दहशतवाद्यांकडे मलेशियातील घरांचे पत्ते आढळून आल्याने मलेशियन सरकारने चिंता व्यक्त केली असून, भारत सरकारला या प्रकरणी चौकशी करण्यात जी मदत लागेल ती पुरवण्यात येईल असे मलेशियन सरकारने आज स्पष्ट केले.

मलेशियाचे पोलिस महानिरीक्षक मुसा हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने अथवा मुंबई पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही माहिती पुरवली नसून, या कामी तपासास मलेशियन पोलिस तयार आहेत.

या हल्ल्यांमध्ये मलेशियाचा कोणताही संबंध नसून, ताजमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडे मलेशियातील बँकांचे क्रेडिट कार्ड आढळून आले आहेत.