गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2015 (10:11 IST)

दाऊद ऑगस्टपासून पाकच्या बाहेर जाऊ शकला नाही!

कराची- कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या तीन भेटी झाल्यात.
 
त्या दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. परिणामी, दाऊद हा ऑगस्टपासून पाकिस्तानच्या बाहेर जाऊ शकला नाही. याला पाकिस्तान आणि मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
 
दाऊद हा पाकिस्तानात नजर कैदेत आहे. त्यामुळे तो कराचीच्या बाहेर जाऊ शकत नाही. यापूर्वी तो बनावट पासपोर्टच्या आधारे मध्य आशियातील देश आणि युरोपात जात येत होता. पण, भारताकडून दबाव वाढल्याने आता त्याला पाकिस्तानातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.