गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कॅनाव्हेरल , सोमवार, 29 जून 2015 (10:50 IST)

नासाचे रॉकेट कोसळले

स्पेस-एक्स-फाल्कन-९  या रॉकेटचा स्फोट होऊन कोसळल्याने नासाची मोहीमेचा अंत झाला आहे. तब्बल अडीच हजार किलोचे साहित्य अंतराळ केंद्रावर पाठविण्यासाठी ही मोहीम सुरु  होती.

या यानाला जोडलेले रॉकेट पहिल्या टप्प्यात वेगळे करण्यात आल्यानंतर अचानक स्फोट होऊन हा अपघात घडला. स्पेस-एक्स यानाचा फाल्कन-९ रॉकेटशी असलेला संपर्क उड्डाणानंतर २ मिनिट व १९ व्या सेंकदाला तुटला. अपघातामागचे कारण शोधण्यासाठी व्हिडियो फितीचे बारकाई निरीक्षण केले जात आहे.