गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: काठमांडू , सोमवार, 27 एप्रिल 2015 (10:23 IST)

नेपाळमध्ये ‘मिशन मैत्री’ जोरात

नेपाळमध्ये भारताकडून सुरु असलेल्या ‘मिशन मैत्री’मध्ये जवानांकडून जोरदार मदतकार्य सुरु आहे. आतापर्यंत १ हजारावर भारतीयांना हवाई मार्गे  सुखरूप परत आणण्यात आले आहे.
 
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय करण्यात आली असून लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होणार आहेत.  भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, भूकंपामध्ये मरण पावलेल्या भारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.