शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

नोकरी पाहिजे तर आधी जन्मपत्रिका दाखवा!

PR
ऐकण्यात फारच विचित्र वाटत आहे, पण चीनमध्ये असे होत आहे. चीनमध्ये नियोक्ता नोकरीच्या उमेदवारांना त्यांचे ग्रह आणि राशींच्या आधारावर इंटरव्यूसाठी बोलवत आहे.

चीनच्या लियाओनिंग प्रांतांतून निघणारे वृत्तपत्र 'बंडाओ मॉर्निंग न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार एका ट्रॅव्हल एजेंसीने आपल्या जाहिरात लिहिले आहे की त्यांना फक्त 'मिथुन, तुला आणि कुंभ राशी"च्या लोकांची गरज आहे.

वृत्तात लिहिले आहे की शू जिंगपिन नावाच्या एका कॉलेज ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक योग्यता असल्यानंतरही हा मोका गमवला आहे कारण त्यांचे सितारे नियोक्तांच्या शर्यतीनुसार नव्हते.

हाँगकाँगचे वृत्तपत्र 'साऊथ चीन मॉर्निंग पोस्ट'चे एमी ली ने देखील या प्रकरणात आवाज काढला आहे. वृत्तपत्राने चेंगदूच्या एका स्टाफच्या हवाल्याने असे सांगितले आहे की तेथे राश्यांप्रमाणेच कुठल्याही उमेदवारांवर विचार करण्यात येतो.

WD
कायद्याचा अभाव : त्यांनी सांगितले, 'सिंह राशीवाले लोक रागीट असतात. त्यानंतर देखील आमचे बरेचसे साथी या राशीचे आहे.'

ली म्हणतात की चीनमध्ये पश्चिमी ज्योतिषशास्त्राची लोकप्रियता बरीच वाढत आहे. इंटरनेटवर बरेच ब्लॉगर्स आहे, जे याच्याबद्दल लिहितात आणि वाचतात आणि त्यांच्या समर्थकांची ही कमी नाही आहे.

ते एका वकिलाच्या हवाल्याने म्हणतात की देशात या प्रकारचे भेदभावाला थांबवणार्‍या कायद्याच्या अभावात नोकरीसाठी आवेदन करणार्‍या लोकांवर होणारे भेदभाव रोखणे फारच अवघड आहे.

हाँगकाँगमध्ये जनसंपर्क हा पेशा असणारे टेरेस वॉन्ग म्हणतात की त्यांच्या येथे नियोक्ता पश्चिमी राशी चिन्हांना कमी महत्त्व देतात, पण ते गुपचुपरीत्या उमेदवारांच्या चिनी राशिचिन्हांना लक्षात ठेवून उमेदवाराचा निर्णय घेतात.