बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2015 (17:14 IST)

नोकरी वाचविण्यासाठी फिट राहणे आवश्यक

तंदुरुस्त राहण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वानाच ठाऊक आहे, परंतु ब्रिटनच्या एका प्रसिद्ध सुपर मार्केटच कर्मचार्‍यांना आता आपली नोकरी वाचविण्यासाठी फिटनेसचे तंत्र शिकावे लागणार आहे.

टेस्को सुपर मार्केटचे नवीन बॉस डेव्ह लुईस यांनी आपल्या स्टाफला आदेश दिले आहेत. कर्मचार्‍यांना फिट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांना नृत्य, धावणे, वेगाने चालणे यासारखी तंत्रे सांगण्यात आली आहेत. सुपर मार्केटच तीन लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना हे मेमो मिळाले आहेत. त्यात त्यांनी कर्मचार्‍यांना तंदुरुस्त राहण्याच्या टिप्स दिल्या आहेत. कंपनीच संकेतस्थळावरदेखील त्यास पोस्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने कर्मचार्‍यांना आकर्षक बनवले जाईल.

लुईस यांनी या मेमोमध्ये आपल्या सर्व कर्मचार्‍यांना लिफ्टऐवजी शिडीने येण्याचाही सल्ला दिला आहे. ब्रेकच्या वेळीदेखील चालत-फिरत राहिले पाहिजे. लांबलचक चालले पाहिजे. पाण्यासाठी स्वत: उठून चालत जावे. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकेल. आपल्या सहकार्‍यांना वॉकिंग बैठकीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ताज्या हवेसाठी बाहेर गेले पाहिजे. त्यामुळे तुमच्यातील सृजनशीलता वाढीस लागेल. नृत्याच्या पातळीवर तंदुरुस्त राहण्याची पद्धती शोधून काढा. ही खूप मजेशीर आहे. त्याचे खूप प्रकार आहेत. तुम्ही कोणतीही पद्धत पसंत करू शकता. टीव्ही कार्यक्रमातील अँड ब्रेकचा वेळ व्यायामासाठी दिला पाहिजे. चढ-उतार, जॉगिंगदेखील करता येऊ शकेल.