शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे हीना-बिलावल जवळ आले!

WD
पाकिस्तान परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार आणि राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांच्या प्रेमाच्या सुरस कथा उघड करणार्‍या बांगलादेशी वृत्तपत्राने आणखी एक नवा खुलासा केला आहे.

बांगलादेशी वृत्तपत्रानुसार, दोन वर्षांपूर्वी हीनाला तिचे पती फिरोज गुलजार यांच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कुणकुण लागली. फिरोज यांची त्यांच्याच कार्यालयातील एका युवतीशी जवळीक वाढत असल्याचे ठोर पुरावेही हीना यांना मिळाले, तेव्हापासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हीना रब्बानीने पतीचे हे कारणामे तिच्या ‍‍वडिलांनाही सांगितले. या प्रकरणानंतर हीना रब्बानी यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला. पाकिस्तानी माध्यमांमध्येही ही बातमी प्रसिद्ध झाली होती. या काळातच हीना रब्बानी आणि बिलावल भुट्टो यांची जवळीत वाढली आणि त्यांचे प्रेम बहरत गेले.

बांगलादेशी वृत्तपत्राने म्हटले आहे, की झरदारी यांना हीना रब्बानी आणि बिलावल यांचे संबंध मान्य नाहीत. झरदारींनी या दोघांना अक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते, तेव्हा ते पुत्र बिलावरवर खूप रागावले. ‍हीनाला मं‍त्रिपद काढून घेण्याची धमकी दिली होती, असेही वृत्तात म्हटले आहे.