गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2016 (16:27 IST)

पत्नीच्या भीतीने करोडपती राहतोय घराच्या बागेत

टेक्सास येथील लेक व्हॅलीतील आलिशान बंगल्यासह कोटय़वधींची संपत्ती असलेला एक करोडपती गेले सहा महिने पत्नीच्या भीतीने घराच्या बागेत मुक्काम करून राहिला आहे. शराफत खान असे या कोटय़धीशाचे नाव आहे. त्याच्याजवळ कपडय़ाचा एक जोड आहे पण पायात बूट चप्पल काही नाही. त्याच्या या परिस्थितीवर न्यायालयाकडून त्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही उलट घराच्या बागेतूनही बाहेर निघा असाच निकाल न्यायालयाने दिला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शराफत याची बायको डॉक्टर आहे. शराफत खान तिला नेहमी मारहाण करत असे व त्या दोघांत नेहमीच भांडणे होत असल्याने शराफतच्या बायकोने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बायकोचे म्हणणे ग्राह्य धरून बंगल्याची मालकी बायकोकडे दिली. त्यानंतर बायकोने त्याला घरात येता येऊ नये म्हणून दरवाज्यांची सर्व कुलपे बदलून टाकली. परिणामी अंगावरच्या कपडय़ांनिशीच शराफतला घराबाहेर व्हावे लागले आहे. त्यांचे शेजारी त्याला खाण्यापिण्याची मदत करताहेत. नातेवाईक व मित्रांनीही त्याला मदतीचा हात देऊ केला आहे मात्र शराफतने ही मदत नाकारली आहे.
 
शराफत खान यांना 30 वर्षाचा एक मुलगाही आहे. मात्र हा मुलगाही आईच्या बाजूने आहे. तो सांगतो, आई वडिलांच्यात सतत भांडणे होतात व वडील आईला मारहाण करतात. त्यामुळे यापूर्वीही एकदा शराफत खानला तुरूंगाची वारी करावी लागली आहे.